इथे व माझ्या ब्लॉगवर ही पाकृ आहे. माझीच असल्याने मी कोठूनही उतरवलेली नाही. तसे असते तर मी प्रथमच ते नमूद केले असते.

प्रश्नकर्त्रीचा मूळ प्रश्न 'ही पाककृती इथून (म्हणजे निर्देश केलेल्या ब्लॉगवरून) उतरवलेली आहे का?' असा नसून, 'इथेही (म्हणजे निर्दिष्ट ब्लॉगवरही) उतरवली आहे का?' (म्हणजे आपण स्वतः तेथेही चिकटवली आहे का?) असा असावा, असे वाटते.

भाग्यश्री तू प्रश्न विचारला आहेस म्हणजे कोणीतरी उतरवली आहे.

असे वाटते.

ह्म्म...  तू दिलेल्या दुव्यावर जाऊन पाहिले,  तिथे 'भानस' असे लिहिलेले दिसले.

मूळ लेखिकेच्या (म्हणजे आपल्या) पूर्वपरवानगीशिवाय चिकटवली असल्यास, त्याने काहीही फरक पडत नाही असे वाटते. हा कॉपी-पेस्ट पद्धतीचे वाङ्मयचौर्य करताना मूळ प्रेषकाचे नाव पुसूनही टाकण्याचे कष्ट न घेण्याचा प्रकार वाटतो.

दुर्दैवाने असे प्रकार आंतरजालावर वाढीस लागले आहेत असे दिसते. तूर्तास तरी अशा संकेतस्थळांवर जाऊन निषेध नोंदवण्यापलीकडे याबद्दल काही केले जाऊ शकते का, याबद्दल साशंक आहे.