जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
वकीली व्यवसाय हा खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याचाच असतो, असे नेहमी बोलले जाते. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी कसाब याचे वकीलपत्र घेतलेल्या काझमी यांनी सध्या जी काही कसाबगिरी सुरू केली आहे, त्यावरून सर्वसामान्यांच्या मनात वकील आणि या व्यवसायाबाबत असलेला समज ते प्रत्यक्षात खरे करून दाखवत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेचा एक अपरिहार्य भाग म्हणून आणि कसाब याला वकील दिला नाही तर हा खटला पुढे चालवताच येणार नाही, या गरजेतून काझमी यांना कसाबचे वकीलपत्र दिले गेले आहे. मात्र कसाब हा कसा सज्जनाचा पुतळा आहे, गरीब बिचाऱया ...