मला वाटते की एखादी गोष्ट आपल्याला आवडली असेल तर ती अजून चार लोकांनीही पाहावी असा उद्देश मनी धरून जर ते दाखवले गेले असेल तर हरकत नसावी. नाव पुसलेले नाही म्हणजे ती आपलीच म्हणून खपवण्याचा मानस दिसत नाही. अशीच अजून एका ब्लॉगवर पालकभजीचीही पाकृ पाहिली होती. त्यांनी मात्र मनोगतवरून उतरवली असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. असो.
टगवंतराव आपल्या स्नेहपूर्वक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. भाग्यश्रीच्या शंकेला आपल्या प्रतिसादाने अजूनच स्पष्टीकरण मिळाले असेल.
भाग्यश्री
( अग तुझे माझे नाव एकच पण तू माझ्या आधी आलीस ना मनोगतावर, मग मला भानस घ्यावे लागले.
)