त्यापेक्षा तूर्त धोका नको म्हणून आपण मराठी लिपीत बदल करण्याऐवजी रोमन लिपीत बदल करू या.

फारच चांगली कल्पना. पहिली सुधारणाः- रोमन लिपी उजवीकडून डावीकडे आणि खालून  वर लिहावी. (२) एकाच इंग्रजी उच्चाराकरिता अनेक अक्षरे आणि एकाच अक्षराचे अनेक उच्चार बंद करावेत. उदाहरणार्त, 'क'साठी सी, के, सीएच्‌, क्यू; 'स'साठी सी, एस्‌, डबल एस्‌, 'श'साठी एस्‌, डबल एस्‌, एस्‌एच्‌, टीसी‌एच्‌, एस्‌सी‌एच्‌, टीआय्‌ओ,वगैरे. (३) अक्षरांची रुंदी सारखी असावी. आय्‌ आणि एल्‌ ची अत्यंत कमी, एन् ,यू-व्हींची मध्यम आणि एम्‌-डब्यू ची कमाल असे नसावे. त्यामुळे  एफ्‌आय्‌, एच्‌ सारखा आणि आर्‌एन्‌, एम्‌ सारखे दिसतात.