शिवाजी महाराजांच्या नावाने..
एक बिडी देखिल आहे.
आपल्याला 'संभाजी छाप विडी' अभिप्रेत आहे असे वाटते.
अर्थात, या विडीचे मूळ नाव 'शिवाजी छाप विडी' असेच असून, जेव्हा ही विडी प्रथम बाजारात येऊ घातली होती (नेमकी कधी ते माहीत नाही, परंतु बहुधा माझ्या जन्माच्या आधी असावी, म्हणजे गेला बाजार पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी किंवा कदाचित त्याच्याही खूप आधी), तेव्हा या विडीच्या मूळ नावाबद्दल मराठा समाजाने घेतलेल्या तीव्र आक्षेपामुळे, तडजोड म्हणून मराठा समाजास त्यातल्या त्यात स्वीकारार्ह (किंवा खरे तर कदाचित त्यातल्या त्यात कमी आक्षेपार्ह) अशा 'संभाजी छाप विडी' या नावाने ही विडी बाजारात आणली गेली, असा काहीसा या विडीच्या नामांतरणाचा त्रोटक इतिहास ऐकलेला आहे. (चूभूद्याघ्या.)