"आज पर्यंत पेशवाई मेजवानीत बुडाली असा आक्षेप कानावर होता पण राज्य कारभार करण्या ऐवजी 'नाच गाण्यात ऐयाशी' करण्यात पेशवाई मग्न होती हा जावईशोध प्रतिमाताईंना कुठून लागला कळायला मार्ग नाही. मला वाटतं, पेशवाई नाच गाण्यात गुंग असताना पाकिस्तान पर्यंतच्या राजांनी 'आम्ही कंटाळलो बुवा राज्य करून, आता तुम्ही करा राज्य आमच्या प्रदेशांवर.' असे म्हणून राज्याच्या सनदा पेशव्यांच्या पायाशी ठेऊन स्वतः काशीप्रयाण केले असावे."

प्रभाकररावांच्या ह्या विधानाशी ज्याने ईतिहास नीट वाचला आहे व अभ्यासला आहे तो सहमतच होईल. भारताच्या ईतिहासातली काळी पाने लिहिली गेली ती ब्राह्मण द्वेष्ठ्या कोत्या मनोवृत्तींमुळेच!  पेशवाईतले रोवलेले अटकेपारचे झेंडे प्रतिभा जोशीना दिसणार नाहीत कारण "मी नाही हो त्यातली" असा आव आणण्याच्या नादांत आपण ईतिहासाला विसरून विधाने करत आहोत व त्याने आपल्या ज्ञानाची कींवच होईल हे लेखीकेच्या गांवीही नसेल.

आजही भारतीय स्थळसेनेला मार्गदर्शक ठरणाऱ्या रणांगणावरच्या ऊत्कृष्ठ रचना (बॅटल प्लॅन्स) ह्या पानीपतच्या असतात ! हिंदुत्व व स्वतंत्र हिंदू राज्याची संकल्पना शिवाजी महाराजांनी रुजवली तर त्याला खत पाणी घालून त्याचा वृक्ष बनवणारे पेशवे होते हा ईतिहास कोणी पुसूं शकेल का? प्रतिभा जोशीं सारख्यांच्या लेखांनी तर नाहीच नाही.  

दूसरी देण्यासारखी अनेक ऊदाहरणे आहेत!                          

शिवाजी महाराजांच्या काळातलेच एकेक उदाहरण घेऊया...

रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडणारे महाराज अनाजीपंतांच्या कुटूंबातील मुलीला-गोदावरीला- पळवून लिंगाण्यावर डांबणाऱ्या संभाजी बाबत मात्र नरमदील झाले. हा अनाजी कोण?त्यांचा पाईक व स्वराज्याची मुहूर्तमेंढ रोवणाऱ्यांपैकी एक-पण ब्राह्मण !

पुढे जाऊन संभाजीने काय दिवे पाजळले व आपल्या वाड-वडिलांचे नांव किती ऊज्वल केले ह्याचा सोयीस्कर विसर लेखिकेला का पडला ? 

संपुर्ण ईतिहास चाळा... वाचणे तर दूर राहो..... प्रत्येक पाना पानावर हिंदवी स्वराज्याला गद्दारी कुणी केली आहे त्यांची जंत्रावळी वाचायला मिळेल. ह्यातली कांही नांवे जाधव, मोरे, भोसले !  जावळीचा चंद्रराव मोरे वा बाजी घोरपडेने कोणता खास पराक्रम गाजविला ते मात्र प्रतिभा जोशी सोयीस्कर रितीने विसरलेल्या दिसतात. 

देवगिरीच्या शंकरराव यादव नंतर आलेल्या निजामशाही, अदिलशाही, ईमाद्शाही, व मोगल सूलतान ह्या सर्वांच्या राजदरबारी राजनिष्ठा बेगमा व बादशाहाच्या पायांवर वाहणारे व त्याईर्षे पोटी एकमेकांच्या नरडीचे घोंट घेणारे कुणी ब्राह्मण होते का ?

एक स्वतः शिवाजी महाराज सोडले तर चौफूला टाईप मनोवृत्ती त्या वेळी कोणत्या राजाची नव्हती ? आपण दिवसा ढवळ्या केलेले पाप ते पाप नसून चालीरीत व दुसऱ्याने केले की त्याला तोफे समोर ठेवणारी राजेशाही ही त्यावेळी अस्तीत्वात होती त्या बद्दल लेखिका मुग गिळून का गप्प बसते ?........

..........कारण ब्राह्मणांना झोडपले तर चालते मात्र ईतर वर्गीयांचा ईतिहास मात्र उगाळला तर काय होईल हे प्रतिभा जोशींना चांगलेच माहीत असावे !