१९७० किंवा १९७१ साली मी अतिशय लहान असल्याकारणाने आणि आजूबाजूच्या अशा प्रकारच्या घटनांचे आकलन होण्याइतकी बुद्धी त्या काळी माझ्याजवळ नसल्याने ही घटना मला आठवत नाही. किंबहुना या घटनेची आणि त्यामागील कारणांची ही माहिती माझ्याजवळ सांगीवांगीनेच आलेली असून तिच्या तपशिलांत माझ्या आकलनातील त्रुटींमुळे चुका असण्याची शक्यता भरपूर आहे.
'असा मी असा मी' मध्ये पत्ता शोधताना शंकऱ्याला नाव विचाऱल्यावर तो (एका जाहिरातीकडे पाहत) 'छत्रपती शिवाजी महाराज' असे उत्तर देतो, तो किस्सा प्रसिद्धच आहे.
'असा मी असामी'चा काळ नेमका कोणता? साधारणतः १९६०च्या सुमाराचा असावा अशी माझी धारणा आहे. ('असा मी असामी'च्या ध्वनिमुद्रित आवृत्तीच्या प्रस्तावनेत असा काहीसा उल्लेख असल्याचे अंधुकसे आठवते.)