निराकार आणि शांतता यांचा संबंध काय? निराकार आहे पण आकार भास आहे हे पटले. पण, ध्वनी भास आहे आणि शांतता मूळ आहे हे थोडे अवघड आहे समजणे. कारण, शांततेची व्याख्या करता येत नाही. ध्वनी ची करता येते. तसेच, अंधाराची करता येत नाही, उजेडाची येते.
पण म्हणा, ध्वनी हे आकारांमुळे निर्माण होणार. त्यामुळे, आकारच जर भास आहेत, तर त्यापासून निर्माण झालेले ध्वनी देखिल भासच असणार. नाही का?