चांगला प्रयत्न आहे.

ईव्होलुशन= उत्क्रांती. (पिढ्यानपिढ्या चालणारी प्रक्रिया)
हेरिडीटी= अनुवांशिकता (पुढच्या पिढीत होणारे संक्रमण)

दोहोंत फरक आहे.

गृहितक: जिवीत मनुष्य हा एक पदार्थ आहे. [ उर्जा नाही. ]
(या गृहीतकाचा संदर्भ कळू शकेल काय? कारण संपूर्ण निष्कर्ष त्यावर अवलंबून आहे.)

आणि-

याचे अर्थ / अनुमान:
१. जिवीत मनुष्य हा पुर्वी म्हणजे या अवतारात [ फॉर्म ] येण्यापुर्वी व या अवतारा नंतर " उर्जा होता व उर्जा असणार"

या दोन्ही विधानात असे गृहीत धरले आहे की अखिल विश्व उर्जा आणि पदार्थ या दोनच स्वरूपात आहे. हे गृहीतक सर्वमान्य होणारे नाही. पंचमहाभूतांचे देहातील अस्तित्व, जड/चेतन असे पदार्थभेद यांचा विचार यात समाविष्ट नाही.

तरीही अंतिम निष्कर्ष मान्य होण्यासारखा आहे. लक्षावधी वर्षानंतर अशा अब्जावधी पर्म्युटेशन्स आणि काँबिनेशन्स नंतर तंतोतंत माझ्यासारखा 'मी' तयार होणे अशक्य नाही. 

चूभूद्याघ्या.