ईव्होलुशन= उत्क्रांती. (पिढ्यानपिढ्या चालणारी प्रक्रिया)
हेरिडीटी= अनुवांशिकता (पुढच्या पिढीत होणारे संक्रमण)

-----मन:पुर्वक धन्यवाद!

गृहितक: जिवीत मनुष्य हा एक पदार्थ आहे. [ उर्जा नाही. ]
(या गृहीतकाचा संदर्भ कळू शकेल काय? कारण संपूर्ण निष्कर्ष त्यावर अवलंबून आहे. )

----- शुद्ध अंत:प्रेरणा. दुसरे, तीसरे काही नाही.

या दोन्ही विधानात असे गृहीत धरले आहे की अखिल विश्व उर्जा आणि पदार्थ या दोनच स्वरूपात आहे.
----- तसे नसले तरीही काहीच बिघडत नाही, जोपर्यंत हे एकमेकांत परिवर्तनीय होणार्या साखळीत आहेत.
म्हणजे असे की,
पदार्थ----> क्ष१---->क्ष२----->क्ष३--->उर्जा----->क्ष४---->क्ष न---->पदार्थ---->क्ष१---->

पंचमहाभूतांचे देहातील अस्तित्व, जड/चेतन असे पदार्थभेद यांचा विचार यात समाविष्ट नाही.
------ पंचमहाभुतांना, मी, अदृश्य गुणवैशिष्ट्यांसमवेत, "अमूर्त" [ "सॉफ्ट" या प्रवर्गात अंतर्भूत केले आहे ]


लक्षावधी वर्षानंतर अशा अब्जावधी पर्म्युटेशन्स आणि काँबिनेशन्स नंतर तंतोतंत माझ्यासारखा 'मी' तयार होणे अशक्य नाही.
----- धन्यवाद!
----- हे तंतोतंत माझ्या सारखे मी तयार होणे माझ्याच पिढीत सिरीयली होण्यास कदाचीत लक्षावधी वर्षे लागतील. हे मान्य.
पण ज्या कोणत्याही दुसर्या, तिसर्या साखळीत त्यांचे " ड +ड एतर" हे माझ्या " ड + न " सारखे पर्म्युटेशन, कॉंबिनेशन ने तयार झाले तर परत मीच म्हणजे माझाच "क्ष" तयार होईल ना. हे माझ्याच हयातीत सुद्धा होऊ शकते.

म्हणजे 'ज्ञ'  साखळीचे " ड + ड एतर" = माझ्या साखळीचे " ड + न" = 'क्ष' = मीच

बरोबर?

हा कालावधी निसर्ग ठरवतो.
बरोबर?

एकमेकांच्या हयातीत एकमेकांसारखी " दिसणारी" माणसे जर जन्मू शकतात,
तर एकमेकांसारखी " असणारी" [ संपुर्णपणे, अगदी मुर्त व अमूर्त सहीत] का बरे जन्मू शकत नाहीत?
यमदूतांना सोपे जावे म्हणून " प्रॉडक्ट आयडेंटिफीकेशन" = "उत्पादन ओळखपत्र"

देव करत असेल?

त्यांच्यात गल्लत व्हायला लागली तर गम्मतच होईल न?