Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
सध्या मी एका विशिष्ट मानसिक अवस्थेतून जात आहे. म्हणजे कसे की अशावेळी नेहमी चमचमीत आवडणारा मी तुमीभा म्हणजे तुप-मीठ-भात खातो; तब्येत आणि मन अशावेळी थोडं हळुवार असतं म्हणून मग धाडधाड रॉक सोडून ईगल्सचं ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ किंवा रहमानचं ‘तू ही रे’ ऐकतो. तर कधी-कधी मूड असा असतो की रात्री उशीरा एखादा मस्त हॉलीवुड किंवा स्टायलीश कोरियन सिनेमा बघण्याऐवजी मी चक्क लवकर झोपतो! थोडक्यात काय तर मी एकदम एक शहाणं बाळ असतो. म्हणजे आईला वाटावं की एकतर चिरंजीव वेडे तरी झाले आहेत किंवा देव तरी पावला.
मला खात्री आहे की आपण सर्वच जण असा मूड कधी कधी ...
पुढे वाचा. : मोठ्यांमधील लहानांसाठी अॅनिमेशनपट आणि एक बोनस! ()