लोकसत्तावाल्यांना पुरेशी माहिती नसल्याने
लोकसत्तेत अनेक विभाग असावेत. जालावरील लोकसत्तेने आजपर्यंत तीनदा आपली अक्षरयोजना बदललेली आहे. सुरवातीला त्यांचे स्वतःचे जवळ जवळ सीडॅकच्या डीव्हीटीटी आराखड्यावर बेतलेले अक्षरवळण होते. नंतर कित्येक वर्षे मिलेनियम वरूण हे वेगळ्याच आराखड्याचे अक्षरवळण होते. अलीकडे त्यांनी युनिकोड देवनागरी आराखड्यातले अक्षरवळण स्वीकारलेले दिसते. त्यामुळे त्यांची तांत्रिक वाटचाल योग्य दिशेने चालू असावी; पण वार्ताहर मंडळी ह्या तांत्रिक गुंतागुंतीपासून लांब असावीत, असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.