संदिग्ध अर्थाचे उखाणे येथे हे वाचायला मिळाले:
"आपण धार्मिक आहोत का?"
गेले कित्येक महीने, कदाचित वर्षं, हा प्रश्न विक्रमाच्या वेताळासारखा माझ्या मानगुटीवर बसला आहे. आज ते भूत परत नव्यानं उगवुन आलं याचं कारण नुक्तंच एका पुस्तकाचं वाचलेलं ब्लर्ब!
थोडं मागं वळून बघायचं तर मी संघाच्या शाळेत शिकलो. अगदी दहावी पर्यंत खाकी चड्डी घातली. शाखेत कधीच गेलो नाही पण शाखेत जास्त आणि शाळेत कमी असणारया मास्तरांवर मनापासून प्रेम केलं. पण म्हणून मी संघिष्ट किंवा कुठलाच पोथीनिष्ठ झालो नाही. पर्यायानं संघाची शाळा माझं कसलंही धार्मिक ब्रेन-वॉशिंग करु शकली नाही. मग मी धार्मिक नाही का? ...
पुढे वाचा. : धार्मिक वगैरे वगैरे