गेलेलें काव्य. एकापेक्षां एक जबरदस्त शेर. हा उजवा कीं तो उजवा ठरवतांच येत नाहीं.

आतां मक्ता या शब्दाबद्दल

गजलचा असा शेवटचा शेर, ज्यात कवीचे नाव गुंफले(लेच) आहे, त्यालाच मक्ता म्हणतात.

भूषणजीच्या या मताशीं मीं सहमत आहे. मक्ता या शब्दावरूनच मक्तेदारी म्हणजे मोनॉपॉली हा शब्द मराठीत आला असें वाचल्याचें स्मरणांत आहे. दुर्दैवानें मीं आज घरापासून दूर आहे आणि शब्दकोष हाताशीं नाहीं आणि स्मरणशक्ती धोका देऊं शकते.

असो. त्यामुळें रसभंग नक्कीच होत नाहीं. मक्तेदारी या शब्दाची व्युत्पत्ती पाहिल्यास अर्थ स्पष्ट होईल.