एकेक अक्षराचा साचा वेगळा असेल (म्हणजे 'ग'चा साचा वेगळा 'म'चा वेगळा ह्याप्रमाणे.); पण एकाच शैलीत काढलेली अनेक अक्षरे एका वळणाची असतात. (उदा. फुगीर, पारंपरिक, आधुनिक, प्रभावी, हलकीफुलकी, अभिजात, स्त्रैण, पुरुषी, नाजुक, राकट वगैरे वगैरे. ) निरनिराळे भाव दाखवण्यासाठी निरनिराळी अक्षरवळणे वापरता येण्याची शक्यता असते. (उदा सौंदर्यप्रसाधनांची वेष्टने, कीटकनाशकांवरची वेष्टने, वर्तमानपत्रे, कवितासंग्रह, निमंत्रणपत्रिका, शुभेच्छापत्रे वगैरे वगैरेंवरची अक्षरे तीच असली तरी त्यांची वळणे कल्पकतेने वेगवेगळी वापरलेली असतात.)