निराकार शांत आहे, तुम्ही शांततेचा मागोवा घेत सुद्धा निराकाराला जाणू शकता म्हणून तर बहुतेक अध्यात्मिक वक्तव्ये : ॐ शांतीः, शांतीः, शांतीः  नी संपतात. मुळात निराकार आणि आकार मिळून अस्तित्व आहे. आकार निराकारात मिसळून जातो. अस्तित्वात द्वैत नाही, द्वैत गैरसमजामुळे भासते. शांतता हा स्वराचा आधार आहे पण कोणताही संगीतकार कधीतरी शांततेची साधना करायला सांगतो का? पण जेवढी कलाकाराची शांतता सघन तेवढा स्वर प्रभावी. जेवढी चित्रकाराची निराकारची (स्पेसची) समज गहन तेवढे त्याचे चित्र रहस्यमय. आकार किंवा ध्वनी हा भास नाही. चार्वाकाचे म्हणणे की आकार सत्य आहे आणि निराकार आकारामुळे भासतो किंवा ध्वनीच खरा आणि ध्वनीमुळे शांतता भासते, शांतता असे काही नाही, हे चूक आहे.  आणि आता तुम्हाला सुद्धा हे पटले असेल.                            संजय