एखादी भाषा शिकली तरी वापराच्या संधीच्या अनुपलब्धतेमुळे किंवा वापराची संधी मुद्दाम शोधण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या अनुपलब्धतेमुळे विसरली जाऊ शकते, ते वेगळेच.

एकदा शिकलेली लिपी कालान्तराने लिहायला जमणार नाही; वाचताना एकदोन अक्षरांशी अडल्यासारखे होईल; फार काय, अगदी जुन्या काळी शिकलेली भाषा अनेक वर्षांनी बोलताना दुसऱ्या भाषेतल्या शब्दांची सरमिसळ होईल, पण त्या भाषेतले बोलणे शंभर टक्के समजेल. पोहायला किंवा दुचाकी चालवायला शिकलेला माणून, कुठलाही सराव नसताना एकदा शिकलेले विसरत नाही.