उपरोल्लेखित लेखात ज्या प्रकारे ब्राह्मणी मनोवृत्तीची सोयिस्कर व्याख्या केली आहे ती निखालस चुकीची आहे. तालिबान वरुन तालिबानी झाले आहे पण ती एक जात नाही. समाजात प्रत्येक जातीला काहीतरी वैशिष्ट्य चिकटलेलेच असते वगैरे मला मान्य नाही. आणि असले कुण्या प्रतिभाबाई जोशींनी जबरदस्तीने चिकटवलेले जातिवाचक वैशिष्ट्य मला आजिबात मंजूर नाही.
ब्राह्मणांनी खोट्या ज्ञानाचा भास निर्माण करुन इतरांना गप्प केले हे मत आपण पुन्हा पुन्हा मांडत आहात. एक म्हणजे गप्प केले म्हणजे काय? पंचायत वगैरे संस्थांमधे वेगवेगळ्या जातींना प्रतिनिधित्व दिले जात होते. त्यांना आपापल्या समस्यांवर दाद मागायला ही व्यासपीठे होती. दलित लोकांवर अन्याय झाला पण बाकी पाटील वगैरे मंडळी काय गप्प बसलेली ह्या गटातली होती? पूर्वापारपासून सधन लोक काय ब्राह्मण होते का? ब्राह्मणांनी केवळ काही निरर्थक धार्मिक विधी इतरांना करु दिले नाहीत. पण पेशवे सोडल्यास सत्ता, धन, सैन्यबळ या क्षेत्रात बाकी जाती पुढे होत्या की. शेती, अन्य कारागिरी या क्षेत्रात आपण पुढे न येण्यामागे ब्राह्मणच कारण होते असे आपले म्हणणे आहे का?
दुसरे म्हणजे अन्य जाती जातिबंधने झुगारुन देताना दिसतात का? शहाण्णव कुळी मराठे नातेसंबंध बनवताना जात बघत नव्हते का? शहाण्णव कुळी मराठे बिगर शहाण्णव कुळी मराठ्यांना कनिष्ट मानत नाहीत का? अस्पृश्य मानल्या गेलेल्या जाती काय केवळ ब्राह्मणच अस्पृश्य मानत होते का? मग इतर जातींना दोष न देता केवळ ब्राह्मणांनाच का?
आपली चोर आणि ज्याच्या घरी चोरी झाली आहे तो ह्या तुलनेविषयी बोलू. इंग्रजीत एक म्हण आहे की मला एखाद्याने एकदा फसवले तर फसवणाऱ्याला शरम वाटली पाहिजे पण त्याने जर मला पुन्हा तसेच फसवले तर मला शरम वाटली पाहिजे. तसे इथे. केवळ एकच मुद्दा घेऊन पिढ्यान् पिढ्या ब्राह्मणांनी समस्त समाजाला फसवले हा आपला दावा असेल (आणि त्यात काही तथ्य असेल) तर फसवल्या जाणाऱ्या उर्वरित समाजाला ती अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. विशेषतः ब्राह्मणांकडे पैशाचे पाठबळ नाही, राजकीय सत्ता नाही, मोठी लोकसंख्या नाही हे बघता.