Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

नेहमीप्रमाणे मैत्रिणींचे स्नेहसंमेलन भरले होते. सगळ्याजणी उत्साहात चिवचिवत होत्या. छान छान खादडंती होतीच बरोबर. जोडीला थोड्या खमंग, चुरचुरीत मधूनच जरा गंभीर गप्पा रंगल्या होत्या. एका मैत्रिणीची बहीण व तिची लहान मुलगीही आज आमच्यात सामील झाले होते. मुलगी-वेदा, खूपच गोड होती. दोन छोट्याश्या वेण्या कानावर घातलेल्या. गोबरे गाल, मिस्कील चमचमणारे डोळे. पाहता क्षणीच उचलून घ्यायचा मोह व्हावा अशी चुणचुणीत पोर. सगळ्या तिचे कौतुक करीत होत्या. अगदी बाळांनाही कौतुक बरोबर समजते, मग ही सोनुकली तर तशी कळती होती. निरनिराळे लाडिक भाव, मध्येच आर्जव करीत ...
पुढे वाचा. : आता मी नाही बदलू शकत स्वत:ला