श्री. वैद्य,
तुम्ही स्वतः जन्माने ब्राह्मण आहात आणि "भूतकाळात चूक केलीत हे मान्य करा" असे म्हणत इतर ब्राह्मणांच्या मागे लागले आहात.
मला माहित असलेली कुठलीही सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्ती स्वतःला मुद्दा पटल्याशिवाय इतरांना पटवायच्या फंदात पडत नाही.
यातून असा निष्कर्ष निघू शकतो की "ब्राह्मणांनी भूतकाळात चूक केली" हे तुम्हाला स्वतःला पटलं आहे.
आता तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी काय करत आहात ते लिहा. आणि त्या तुमच्या परिमार्जनाच्या कार्यात "ब्राह्मणांना झोडपण्यानी" कशी भर (value addition) पडते आहे तेही सांगा.
जसे तुम्ही ब्राह्मणांच्या चुका हिरीरीने मांडता आहात तश्याच इतर जातींच्या चुका कुठे दाखवून देत आहात का?
तुम्ही मांडलेली मते आणि आरोप आजच्या घडीला किती लागू आहेत? ते पुर्णतः सत्यावर आधारीत आहेत की केवळ ऐकीव माहितीवर आहेत?
या चर्चेत अनेक मनोगतींनी अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिले, त्या बाबतीत तुम्ही स्वतः काही अभ्यास, वाचन केलंत का? स्वतःचे जुने प्रतिसाद नवीन केलेल्या वाचनानुसार पडताळून पाहिलेत का?
इथे उत्तरांची अपेक्षा बिलकुल नाहीये, फक्त स्वतःला विचारा!
(तुमच्या प्रतिसादाचा प्रतिसाद इथेच संपला.)
===
===
असो. एकूण निरुपयोगी चर्चा आहे असे दिसते. एकच मुद्दा परत परत परत परत परत परत परत उगाळला जात आहे, नवीन काही नाही. मी माझ्या बाजुनी ही चर्चा बंद करतो आहे.
===
चू.भू.द्या.घ्या.
-भोमे-काका