श्री. वृकोदर ह्यांस.

उपरोल्लेखित लेखात ..... आजिबात मंजूर नाही. 

आपण व मनोगती ह्यास अपवाद असणार हे मी आधीच नमुद केले होते.

ब्राह्मणांनी खोट्या ज्ञानाचा भास निर्माण करुन इतरांना गप्प केले हे मत आपण पुन्हा पुन्हा मांडत आहात.

मुळात माझा मुद्दा, ज्ञानदानाचे कार्य ब्राम्हाणांनी नीट केले नाही, हा होता. ( भाग-१ ) त्यावर "वेदपुराणात असे काहीही नव्हते ज्यामुळे समाज प्रगतीपथावर लागला असता. मुख्यतः कालबाह्य, अवैज्ञानिक, निरर्थक गोष्टींचे त्यात वर्णन आहे." असे आपले उत्तरे होते. मग एकंदर ब्राम्हणांनी जे केलं त्याला "खोट्या ज्ञानाचा भास निर्माण करणे" नाही तर अजुन काय म्हणायचे ?

पंचायत वगैरे संस्थांमधे वेगवेगळ्या जातींना प्रतिनिधित्व दिले जात होते. त्यांना आपापल्या समस्यांवर दाद मागायला ही व्यासपीठे होती.

"पूर्वीच्या काळी सरकारी कायदेकानू नव्हते. राजा देईल तो न्याय अशी परिस्थिती होती. राजाच्या वरचे स्थान धर्म पिठाचे होते.  समाजातील आचार विचारांना काबूत ठेवण्यासाठी धर्मपीठही (धर्मसमस्या निगडीत) न्याय निवाडे करीत असे." असे आधीच्या एका उत्तरात आहे. जात-पात ही माझ्यामते धार्मिक समस्याच आहे. पंचायत व्यवस्था भारतात कधीपासुन आली ? इतर जातींना ह्या गोष्टीत प्रतिनिधित्व कधीपासुन मिळू लागले, समस्यांवर दाद मागण्यासाठि नक्की कोणती व्यासपीठे होती ? ह्या बद्दल थोडं स्पष्टिकरण मिळेल काय ?

दुसरे म्हणजे अन्य जाती ...... इतर जातींना दोष न देता केवळ ब्राह्मणांनाच का?

विषय "ब्राम्हणांना आणखी किती झोडपणार ?" हा असल्याने, चर्चा ब्राम्हणांभोवतीच असणार. आपल्याला का झोडपतात ? आपलं काही चुकलं होतं का ? असे प्रश्न मला पडले, व तेच मी चर्चेत मांडतो आहे. आपला वरील युक्तिवाद, "फ़क्त ब्राम्हणांनाच का झोडपता?" ह्या सदराखाली निर्विवादपणे सत्य असेल, ह्यात काहीच शंका नाही. सध्याच्या  चर्चेत इतरांकडे बोटे दाखवून, फ़क्त आम्हाला का झोडपता, त्यांना का नाही झोडपत ? हा प्रश्न मला तरी गैरलागू वाटतो आहे.

केवळ एकच मुद्दा घेऊन ..... लाजिरवाणी गोष्ट आहे.

अजून फ़सवले जाण्यास आता कोणीही तयार नाही. माझ्यामते, गेल्या काही वर्षात भारताने बरीच प्रगति केली असुन, ह्यापुढेही ती अशीच चालू राहील, व त्याचबरोबर, जात-पात, धर्म ह्याविषयातील जहालपणा हळुहळु कमी होत जाईल. त्यात लोकशाही असून, कायद्याचे राज्य आहे ( बऱ्याच प्रमाणात ). निदान न्यायनिवाडे न्यायालये करतात, पंचायत वा धर्मपीठे नाही. त्यामुळे पुन्हा कोणाला असे फ़सविणे जरा कठीणच वाटतय.

झालंगेलं विसरुन, ब्राम्हणांना झोडपण बंद व्हावे ही माझीही इछ्छा आहे. भोभेकाका म्हाणाले त्याप्रमाणे द्वेशाने काहीच साध्य होणार नाही. पण त्यासाठी, त्यांना थोडा समंजसपणा दाखवावा लागेल, आणि आपल्यालाही थोडफ़ार आत्मपरीक्षण करावे लागेल.

मयुरेश वैद्य.