श्री. भोभेकाका,

इतक्यात, श्री.वृकोदर ह्यास मी दिलेला प्रतिसाद ( सोम, १६/०५/२००५ - १८:०४ ) कृपया वाचावा. आपल्या काही प्रश्नांची उत्तरे त्यात आपणास मिळतील अशी आशा आहे. माझ ज्ञान आणि कार्य श्यून्य आहे, असे मानून चाललो तरी, मी विचारलेल्या मोजक्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे, मलाही मिळालेली नाहीत. ज्याठिकाणी योग्य प्रतिसाद/उत्तरे मिळालीत, ते प्रश्न, शंका मी पुन्हा उपस्थित केलेले नाहीत. त्यातले जे काही प्रश्न उरलेत, त्यावरच चर्चा/वाद चालु आहे.

पण, वर म्हाणालो त्याप्रमाणे , ह्यासदरात, केलेला युक्तिवाद, (भाग १-२) "ब्राम्हणांना आणखी किती झोडपणार ?" ह्यापेक्ष्या, "फ़क्त ब्राम्हणांनाच का झोडपता ?" ह्यासदरात चपखलपणे बसणारा आहे. नवीनसदराखाली जर चर्चा सुरु असती, तर माझे प्रश्न मी तिथे मांडलेच नसते. विषय आपण आणि ते असल्यामुळे, मी त्यात इतरांना न आणता आपल्याबद्दलच बोलतो आहे. माझे म्हाणणे समजून घ्याल ही अपेक्षा.

मयुरेश वैद्य.