तुम्ही एखाद्याचा आदर करता म्हणजे काय करता हे तुम्हीच सांगा...

मराठीत आदर करणे असा शब्दप्रयोग प्रचलित आहे काय? भाषेपुरतं बोलायचं झालं तर, आदर/मान ही क्रियापदं नसल्यामुळे वाक्यात प्रयोग करताना काहीतरी क्रियापद नको का. म्हणून मग, आदर/मान करणे, असणे, राखणे, देणे, घेणे असे वापरले जाते. माझ्य दृष्टिने मी एव्हढंच साधं विश्लेषण करू शकतो.

एखाद्या व्यक्तीचा मी आदर करतो / करते म्हणजे नक्की काय करणे अपेक्षित आहे? 
 मी एखाद्दयाचा आदर करतो, म्हणजे त्या व्यक्तीची मतं, विचार, निर्णय हे देखिल बरोबर असू शकतात (किंवा असेही विचार असू शकतात) हा दृष्टिकोन बाळगणे, असा अर्थ अभिप्रेत आहे (मला तरी).