सतीशजी,
मनोगतींना विरोध का करता आहात असे विचारण्यापूर्वी, सध्याच्या लिपी आणि फाँटस मध्ये नक्की काय अडचणी आहेत हे सिद्ध करा. केवळ दोन तीन सुपीक डोक्यांमध्ये काहीतरी वैचित्र्यपूर्ण कल्पना येतात, म्हणून त्या कल्पनांना इतरांनी विरोध न देता सकरात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा का? अनेक प्रतिसादांमध्ये हे शुद्ध शब्दांत लिहीले आहे, की गांगल जे काही करू पाहता आहेत त्याला काही अर्थ नाही.
अर्धवट माहीतीच्या आधारे हे सर्व चालू आहे. लोकसत्तेतील पहिल्या लेखात श्री गांगल यांनी आपल्य दीर्घ वेलांटीला दुजोरा देण्यासाठी समर्थ रामदासांची साक्ष काढली आहे. 'विचार' हा शब्द समर्थांनी 'वीचार' असा मनाच्या श्लोकात वापरला आहे. गांगल यातून वाचकांची दिशाभूल करता आहेत. विचार हा शब्द ऱ्हस्व आणि दीर्घ इ या दोन्ही प्रकारे वापरलेला आहे. ज्या ठिकाणी तो दीर्घ आला आहे, त्या ठिकाणी वृत्तात बसवण्यासाठी तसे केले आहे, हे सांगण्यास गांगल विसरले. ऱ्हस्व दीर्घ ची अशी अदलाबदल करण्याचे स्वातंत्र्य कवी नेहमीच घेत असतात. या मनाच्या श्लोकातील एक उदाहरणावरून त्यांनी इकार १९५० पूर्वी दीर्घ लिहीले जायचे याचा पुरावा म्हणून दिले आहे.
गांगल यांच्या संकेत स्थळावर फारच त्रोटक माहीती दिली आहे.
आता सांगा विरोध करायचा नाहीतर नक्की काय करायचे?