संवादिनी येथे हे वाचायला मिळाले:
मेपलच्या झाडाची पानं पडायला लागलीत. हिवाळा आता काही फार दूर नाही. हवेतला गारवा वाढायला लागलाय. हल्ली संध्याकाळी, पडत्या उन्हाच्या किरणांच्या शाली पांघरून येईनाश्या झाल्यात. त्याऐवजी काळ्या रंगाच्या अंधाराचं जाजम पांघरूनच त्या पसरतायत.
गोधुल्या वेळी सूर्याने आपला पसारा आवरत घेतला की उगाचच रिकामं रिकामं वाटतं. नारायणाचं दुकान बंद झालं की उरतो हताश रिकामपणा. अंधार. अंधाराची मला भीती वाटते. अंधारापेक्षासुद्धा लांब लांब होत चाललेल्या सावल्या ज्या वेळी नाहीश्या होतात ती वेळ मला भीती घालते. म्हणूनच कदाचित तिला दिवेलागणीची वेळ म्हणत ...
पुढे वाचा. : वाट पाहण्याचा खेळ