सावरकरांची 'अ'ची बाराखडी मागे पडली याचे कारण केवळ नवीन तंत्रज्ञान आले हे नव्हे, तर 'अ'ला वेलांटी, उकार आणि मात्रा देऊन अ‍ि, अ‍ी, अ‍ृ, अ‍ु, अ‍ू, अ‍े, अ‍ै असे लिखाण करणे अशास्त्रीय आहे हे, तशा लिखाणाच्या पुरस्कर्त्यांनी मान्य केले. कारण 'अ'ला स्वरचिन्हे जोडण्यास देवनागरी लिपीत मुळात पायमोडका 'अ‍' हवा. तसा तो नाही म्हणून सुधारणा अशास्त्रीय.