तत्त्व म्हणून वरील मुद्दा मान्य होण्यासारखा आहे.
परंतु शेवटी लिपी ही भाषेच्या लिखाणाच्या सोयीकरिता असते, भाषेच्या व्याकरणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे हे लिपीचे प्राथमिक उद्दिष्ट नसते, लिपी हा शेवटी एक सर्वमान्य संकेत आहे, हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यास हा मुद्दा अतिशय गौण आहे असे वाटते.
तसेही अि, अु, अे या अक्षरांसाठी वरील जो आक्षेप आहे, तोच आक्षेप आ आणि ओ या अक्षरांसाठीही लागू होण्यासारखा आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. परंतु आ आणि ओ ही अक्षरे संकेताने सर्वमान्य असल्याकारणाने तसा आक्षेप घेतला जात नाही.