अ ला ा ो आणि ौ ही स्वरचिन्हे लावली जातात त्याप्रमाणे इतरही लावता आली असती.
ऋ हे अक्षर अृ ह्या अक्षराचे अपभ्रष्ट/संस्कारित रूप असावे. अृ हे थोडे थोडे बदलत गेले (किंवा मोडीतल्या सारखे धावते, घाईघाईने काढत गेले!) तर ऋ पर्यंत पोहोचलेले नैसर्गिक वाटते.
पूर्वी किशोर मासिकात श्याम जोश्यांच्या हास्यचित्रकथा येत असत त्यात त्यांनी एका कथेत ऋचा ऐवजी अृचा असे लिहिलेले पाहून मला गंमत वाटली होती. तेव्हाच मला वरील गोष्ट सुचली.