बंगाली लिपीत इ, ई, उ, ऊ, ए आणि ऐ यांप्रमाणेच ओ आणि औ या अक्षरांसाठीसुद्धा स्वतंत्र चिन्हे आहेत. मात्र आ हे अक्षर अ या अक्षरास काना लावूनच लिहिले जाते. गंमत म्हणजे, जुन्या मराठीत 'ऍ' या ध्वनीसाठी जशी 'या' या ध्वनीसाठीचे चिन्ह जोडण्याची प्रथा होती - आणि उच्चारही बहुधा तसाच केला जात असे - (जसे, 'कँप' ऐवजी 'क्यांप' वगैरे), तशीच पद्धत बंगालीतही आहे, आणि एवढेच नव्हे, तर ही पद्धत 'अ'च्या विस्तृत 'बारा'खडीतील 'ऍ'साठीसुद्धा वापरली जाते. उदाहरणार्थ, 'ऍस्पिरीन' या शब्दातील 'ऍ'साठी 'अ'ला 'या' जोडण्यात येतो. (हे बंगाली लिपीत जसे केले जाते तसे देवनागरीत उदाहरणादाखल करून दाखवणे अशक्य आहे असे वाटते.)