टोपीकराकडील छपाईयंत्राबद्दल ऐकून आणि त्याच्या उपयुक्ततेबद्दल थोडीफार कल्पना आल्यामुळे त्याबाबत शक्य झाल्यास अधिक माहिती काढण्यात आणि जमल्यास असे एखादे यंत्र टोपीकराकडून खरेदी करता येईल का हे पाहण्यात शिवाजीमहाराजांनी रस दाखवला होता, अशी एक गोष्ट कधीतरी कोठेतरी उडत‌उडत वाचल्याचे स्मरते.

इतिहासाचा अभ्यासक, संशोधक किंवा तज्ज्ञ नसल्याकारणाने अधिक तपशील माझ्याजवळ नाहीत आणि या गोष्टीच्या सत्यासत्यतेबद्दल ग्वाहीही देऊ शकत नाही. परंतु एकंदरीत छपाईतंत्र टोपीकराने आपल्यावर लादले नसून सोयीकरिता आपणच ते अंगीकारले असण्याची शक्यता दाट वाटते. (अन्यथा स्वातंत्र्यानंतर छपाईतंत्राचा, तसेच रेल्वेसारख्या टोपीकराने 'लादलेल्या' इतर गोष्टींचा त्याग करणे इष्ट ठरले असते.)

खुद्द छपाईतंत्राप्रमाणेच, छपाईतंत्र एतद्देशीय भाषा आणि त्यांच्या लिप्यांकरिता अंगीकारासाठी बनवताना/वळवताना ते तसे आपल्यावर लादले गेले हे विधान सरसकट आणि धाडसाचे वाटते.