अप्रतिम!

पाहून वादळाला झाला पसार नाही
हा कोणता दिवा जो विझण्या तयार नाही? - वा वा!

गेले अनेक श्रेष्ठी लावून दीपमाला
अंधार क्षीण होण्या काही तयार नाही! - सुंदर

मी का न  भिरभिरावे फुलपाखराप्रमाणे?
नाहीतरी फुलांची निष्ठा अपार नाही - नाहीतरी फुलांची निष्ठा अपार नाही... व्वा!

किलबिल न पाखरांची, ना सावली न उंची
झुडुपास कोण सांगे, तो देवदार नाही?

शब्दांत रंग भरतो मी भाव-भावनांचे
जीवन चितारुनीही मी चित्रकार नाही? - जीवन चितारुनीही... सुंदरच!

कविता करीत जातो तोटा-नफा न बघता
हा मोद जीवनाचा, हा रोजगार नाही - तोटा नफा न बघता ... हा रोजगार नाही... व्वा वा!

थकतील डुंबणारे वेचून मौक्तिकांना
ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही

धिक्कारही न झाला, नाही निषेध यंदा
शब्दांत, भृंग, उरली ती तीक्ष्ण धार नाही

सुंदर गजल मिलिंद! अतिशय आवडली. अनेक शेर अप्रतिम आहेत.

अजून येउदेत.