पाकीस्तानी वर्तमानपत्र 'डॉन' मध्ये भारतीय निवडणुकांवर आलेला एक लेख :
दुवा क्र. १

"डॉन" मध्ये आता छापून आलेला लेख वाचून, श्रीरामाने, मार खाल्लेल्या सुग्रीवाला कसे झापले असेल याचाच अंदाज येतो.
लेख वाचून मला पडलेले काही प्रश्न असे:

या लेखात वर्णलेली भारताची बलस्थाने, वा बांगलादेशाचे कर्तुत्व, जेंव्हा भाजप केंद्रात आले तेंव्हाही होते, मग आताचे " समय औचित्त्य" काय व कसे?

१. असाच जल्लोष चालणारा फोटो, जर भाजप सत्तेवर आला असता तर "डॉन" वा तत्सम पेपराने छापला असता का?
२. या फोटोवरून "त्यांना" सुद्धा हेच केंद्रात पाहिजे होते असाच अंदाज निघतो का?
३. त्यांनी, इथल्या निवडणूकींमध्ये प्रत्यक्ष प्रभाव टाकणारी, जातीय / धार्मीक समीकरणांद्वारे त्यांची "आवड" संपूर्ण भारतावर लादली असेल काय?
४. संस्थानांनी, अणुकरार धोक्यात टाकून, " राष्ट्रहितवादी" सरकार, इथे केंद्रात येउ दिले असते काय?
५. संस्थाने, त्यांच्या देशात "उच्चशिक्षीत" नेता, " इथे" असणे पसंद करतील की " प्रखर राष्ट्रहितवादी" देशी नेते इथे खुर्चीवर बसलेले त्यांना आवडेल?
६. सत्ताधिष व डावे, २६/११ नंतर, "क्षेत्रीय" महासत्तांची, "चाकोरीबाहेरची" मदत मिळवू शकले नाहीत. कारण क्षेत्रीय महासत्तांना देखील या उपखंडात उद्ध नको होते. मग त्यांना "राष्ट्रहितवादी" पक्ष सत्तेवर आला असता तर त्यांची डोकेदुखी वाढली असती का कमी झाली असती?

ये पब्लीक है, ये सब जानती है. होय नं?

धन्यवाद !