राजाच्या वरती धर्मपीठ असे वगैरे गोष्टीत तथ्य नाही. एखाद्या संस्थानिक त्या संस्थानाचा सर्वेसर्वा असे. त्याच्या वर अपील नव्हते. तुलनेने आधुनिक भूतकाळात तरी हीच स्थिती होती. पंच पद्धती अनेक वर्षे आहे.
  दुसरे हे की जे ब्राह्मण दुसऱ्यांना निरर्थक रुढी शिकवत होते ते स्वतःही त्या रूढींना बळी पडलेले होते. अनेक वर्षे संथा घोकणे, पूजा, जपेतपे, यज्ञयाग याकरिता लागणारा वेळ, कष्ट तेही घालवतच होते. बहुतेक ब्राह्मण दरिद्री असत आणि तरी ह्या रुढींच्या बाहेर पडत नसत. त्यामुळे पद्धतिशीरपणे व्यूह आखून समस्त बहुजनांना बकरा बनवला असे त्यांनी केलेले नाही. तेही त्याच कर्दमात अडकलेले होते. उलट सधन लोकांना (तथाकथित) निम्न जातीच्या लोकांना निम्न व्यवसायात अडकवण्यात स्वार्थ होता की कमी पैशात काम करुन मिळत असे.
  दुसरे असे की ज्या जाती जसे मराठा, शिंपी, माळी, जैन इत्यादी स्वतः ब्राह्मणांप्रमाणेच शिवाशिव पाळत असत ते आता दलितांबरोबर ब्राह्मणांना झोडपण्यात आघाडीवर आहेत. हा दुटप्पीपणा का? आज जे ब्राह्मणांकडे एक बोट रोखत आहेत त्यातील कित्येकांची चार बोटे स्वतःकडे रोखलेली आहेत हे विसरतात. काही ब्राह्मणांना जातीचे आत्महनन केल्याने संतुष्टी लाभते. पण बाकीच्यांचे काय? असला दुटप्पीपणा पाहून संताप येत नसेल तरच नवल.