खुप सुंदर वर्णन आणि गोष्ट ही छान रंगवलीय...., मला खुप आवडली.

फक्त एक प्रश्न आहे. जो मला वाटला तो मी नमुद करते...... की एका स्त्री आणि पुरुषाची निखळ मैत्री असू शकत नाही का? बऱ्याच  कथा कादंवरीत अशा प्रकारचाच शेवट होतो. फारफार तर हिंदी सिनेमात सुद्धा हेच दाखवतात... तर एका स्त्री व पुरुषामध्ये २५/३० वर्ष साधी स्वच्छ मैत्री पण होऊ शकत नाही... याचं खुप वाईट वाटलं. जर असं झालंही तरी फक्त प्रेमच असावं त्यात, की प्रेम म्हणजे शारीरीक संबंध? हे जरा पटलं नाही...

बाकी सुंदरच आहे कथा!!!