ह्यावरून एक विनोद आठवला.
एकदा एक बाई सर्दी झाली म्हणून डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर त्यांना सांगतात, "काही नाही, साधी सर्दी आहे. याला माझ्याजवळच नव्हे, साऱ्या जगात काही औषध नाही. पण काही हरकत नाही. सर्दीनं आजवर कोणी मेलेलं नाही. दुर्लक्ष करा, आठवड्यात आपोआप बरी होईल."
बाई मानायला तयार नसतात. कितीही समजावले तरी ऐकत नाहीत. शेवटीशेवटी तर डॉक्टरांच्या कौशल्याबद्दलच शंका घेऊ लागतात.
सरतेशेवटी वैतागून डॉक्टर बाईंना म्हणतात, "ठीक आहे. असं करा, एकदम बर्फाळलेल्या थंड पाण्यानं तासभर आंघोळ करा. त्यानंतर अंग न पुसता पंख्याखाली तासभर तशाच उघड्या बसा. घरात एसी असेल तर तोही लावा. आणि मला उद्या कळवा. "
बाई म्हणतात, "काय? त्यानं माझी सर्दी बरी होईल?"
डॉक्टर म्हणतात, "नाही, पण त्यानं तुम्हाला न्यूमोनिया होईल. आणि न्यूमोनियासाठी माझ्याजवळ औषध आहे."
अर्थात इथे हिटलरची आणि गांगलांची (सावरकर आणि गांगलांच्या धरतीवर) मुळीच होऊ शकत नाही. पण हिटलरच्या कल्पनांना जसा आम्ही विरोध करतो तसेच गांगलांच्या विचित्र कल्पनांना विरोध करायला हवा.
हिटलरच्या विचित्र कल्पनांच्या परिणामांची गांगलांच्या विचित्र कल्पनांच्या परिणामांशी किंवा हिटलरला असलेल्या जनाधाराची गांगलांना असलेल्या जनाधाराशीही तुलना होऊ शकत नाही. मग झाले तर.
अर्थात हा विरोध किती कडाडून करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
सहमत.
पण दुर्लक्ष करण्यात मला तरी पलायनवादच दिसतो.
ज्याचेत्याचे मत. प्रत्येकाला एकएक (तरी) असतेच. ('मत ज्याचेत्याचे, मला काय त्याचे'.)
(तसेही हिटलरच्या मृत्यूनंतर ५४ वर्षांनी त्याच्या कल्पनांना कडाडून विरोध करण्यास फारसे शौर्य आवश्यक नसावे.)