आय्ईवरही कान्याआधी वर्तुळ दिसते आहे. ा, ि, ी, ही चिन्हे काढताना कधीकधी वर्तुळ टाळता येत नाही असे दिसते आहे.
आयईवर मला आलेल्या अनुभवाप्रमाणे, ा, ि, ी वगैरे चिन्हे स्वतः टंकली असता वर्तुळ दिसत नाही. परंतु दुसऱ्याने लिहिलेला मजकूर कॉपी-पेस्ट करताना त्या मजकुरात जर ही चिन्हे असली, तर मात्र त्या चिन्हांबरोबर वर्तुळ येते. मात्र अशी वर्तुळ आलेली चिन्हे शोधून काढून, खोडून पुन्हा टंकल्यास अशी वर्तुळे टाळता येतात असा अनुभव आला.