मागावे येथे न कुणाला काहीही...
ओठांवर आधीच नकारांची गर्दी!

माझेही अजिबात जमेना माझ्याशी...
- मग झाली दोघांत करारांची गर्दी!!

अर्थांना मिळणार कसे घर दर्जाचे?
शब्दांच्या गावात सुमारांची गर्दी!

ही आहे थांबून किती वर्षे येथे?
- मेंदूच्या चौकात विचारांची गर्दी!                  
... प्रदीपजी, हे खासच - एकूणच गझल अपेक्षेप्रमाणे सुरेख !