हिटलरच्या मृत्यूनंतरही त्याच्या कल्पना, त्याचे विचार जिवंत आहेत. जगभरातील व भारतातील उदाहरणे देता येतील. त्याच्या कल्पनांना व विचारांना कडाडून विरोध करण्यास नक्कीच शौर्य आवश्यक आहे, असे वाटते.

शौर्याबद्दल कल्पना नाही. (तेवढी गरज भासलीच आणि इच्छा असलीच तर) जोरदार प्रतिवादास तोंड देण्याची तयारी आवश्यक आहे हे मात्र खरे. हिटलरच्या कल्पना आणि विचार जोपर्यंत आचरणात आणले जात नाहीत तोपर्यंत त्यांचा विरोध करण्यास शौर्याची गरज नसावी.

बाकी विरोध करावा की नाही हे ज्याचा विरोध करायचा ते विरोध करण्याच्या लायकीचे आहे की नाही या निकषावर प्रत्येकाने आपापल्या विचाराप्रमाणे ठरवावे. माझ्या मते हिटलरची मते विरोध करण्याच्या लायकीची आहेत, गांगलांची नाहीत. पुन्हा, ज्याचेत्याचे मत. (प्रत्येकाप्रमाणे मलाही आहे. आणि प्रत्येकाप्रमाणेच मलाही माझ्याचा अभिमान आहे.)

गांगलांच्या कल्पनांना विरोध करण्यास मात्र फारसे शौर्य आवश्यक नाही.

सहमत. आणि मला वाटते हाच कळीचा मुद्दा आहे.