'ब्राह्मणांनी ज्ञान स्वतःजवळ ठेवून इतर जातींना त्यापासून वंचित ठेवले आणि त्यांच्या 'मागासलेपणाला' ब्राह्मण जबाबदार आहेत.' हा वादाचा मूळ मुद्दा होता. एका विशिष्ट जातीला इतर सर्व जातींच्या मागासलेपणास जबाबदार धरल्यावर ब्राह्मणांबरोबर इतर जातीही चर्चेत येणारच. ब्राह्मणांना झोडपण्याचे सुख उपभोगताना ब्राह्मणांनी प्रतिवार करू नये, जाती-जातींची तुलना करू नये, अनिष्ट प्रथांचा जातीय तौलनीक आढावा घेऊ नये, फक्त झोडपून घ्यावे असा दुराग्रह का?
ज्याठिकाणी योग्य प्रतिसाद/उत्तरे मिळालीत, ते प्रश्न, शंका मी पुन्हा उपस्थित केलेले नाहीत.
आपल्याला कुठले प्रतिसाद/उत्तरे योग्य वाटली. याचा उच्चार आपण कूठे केल्याचे आढळले नाही. जर एखाद्याचा मुद्दा आपल्याला पटला असेल तर तसे जाहीरपणे सर्वांना कळविण्यात कमीपणा कसला. वादात भाग घेणाऱ्यांनी 'आता जुन्या पैकी हा मुद्दा दिसत नाही, म्हणजे तो बहुधा पटलेला असावा' असे सारखे गृहीत धरत चर्चा चालू ठेवायची अशी आपली इच्छा दिसते आहे. तशी सर्वांना मान्य होईलसे दिसत नाही. कारण कुठल्याही समतोल चर्चेत वादग्रस्त मुद्दा उपस्थित केल्यावर त्यावर प्रतिवाद केला जातो. आपल्याला तो पटल्यास इतरांना तसे सांगून आपले या मुद्द्यावर समाधान झाले असल्यामुळे आपण हा मुद्दा मागे घेत आहोत असे सांगावे. न पटल्यास त्याच मुद्यावर प्रतिवाद का पटला नाही, यावर भाष्य करावे. असो.
माझ ज्ञान आणि कार्य श्यून्य आहे
आपली 'उक्ती आणि कृती' यात जमिन आस्मानाचा फरक आहे. ज्ञान शून्य आहे असे स्वतःच म्हणता पण ज्ञानार्जनासाठी लागणारी नम्रता आणि ऐकून घेण्याची विद्यार्थीवृत्ती आपल्या ठायी नाही. हा व्यक्तीगत शेरा आपल्या वरील व्यक्तीगत कबुलीतून जन्मला आहे. अन्यथा, व्यक्तीगत पातळीवर शेरेबाजी, सल्ले, टोमणे हा माझा प्रांत नाही.
माझे म्हाणणे समजून घ्याल ही अपेक्षा.
त्याच बरोबर आपणही 'ब्राह्मणांचे' म्हणणे समजून घ्याल ही अपेक्षा.