युनिकोडमधील zwj (झीरो विडथ जॉइनर) ह्या वर्णाचा इतर वर्णांशी आलेला संपर्क हाताळण्यावर ै ी इत्यादीची हाताळणी अवलंबून असते. ही हाताळणी योग्य तऱ्हेने व्हावी म्हणून करायची उपाययोजना चालक प्रणालीत केलेली असते असे वाटते. (माझ्या मर्यादित ज्ञानाप्रमाणे युनिस्क्राइब.डीएलएल ही सेवा पुरवत असते. ) उबंटू इत्यादी चालकप्रणालींमध्ये त्यासाठी काय व्यवस्था असते माहीत नाही. ही हाताळणी (सर्व शक्यतांचा विचार करूनही) झाली नाही तर जोडणी कशी करायची ते न कळल्यास उमटवायचे अक्षर (ह्या ठिकाणी ठिपक्या ठिपक्याचे वर्तुळ)उमटवले जाते, असे मला वाटते.
चू. भू. द्या. घ्या.