मिलिंदराव,
एक ताजी, सशक्त, आशय-संपन्न गझल वाचल्याचा आनंद मिळाला...
पाहून वादळाला झाला पसार नाही
हा कोणता दिवा जो विझण्या तयार नाही ?.. वा
गेले अनेक श्रेष्ठी लावून दीपमाला
अंधार क्षीण होण्या काही तयार नाही !... एकदम सही..
मी का न भिरभिरावे फुलपाखराप्रमाणे ?
नाहीतरी फुलांची निष्ठा अपार नाही.. वा वा!!
कविता करीत जातो तोटा-नफा न बघता
हा मोद जीवनाचा, हा रोजगार नाही.. खरेय..
थकतील डुंबणारे वेचून मौक्तिकांना
ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही.. मस्त
मक्त्यातील 'भृंग' चा संदर्भ लागला नाही..
-मानस६