पुर्नजन्म हा जिवाशी (आत्म्याशी) निगडीत असतो, पुर्नजन्म घेणारा जीव त्याच्याच गत जन्मातील वंशावळीत जन्म घेईलच असे नाही.
तुम्ही दिलेल्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी काही गोष्टी गृहीत धराव्या लागतील.
गृहीतक १) समजा पुर्नजन्म घेणारा आत्मा हा त्याच वंशावळीत जन्म घेईल. (याची १००% खात्री नाही.)
मी (क्ष)= मुर्त+अमुर्त
क्ष१= क्ष ची अनुवंशीकता( मुर्त+अमुर्त)+ क्ष ची अननुवंशीकता (मुर्त+अमुर्त)
क्ष(n)= क्ष (n-१)ची अनुवंशीकता( मुर्त+अमुर्त)+ क्ष (n-१) ची अननुवंशीकता (मुर्त+अमुर्त);
गृहीतक:
समजा क्ष(मी) २०व्या शतकातील व त्याचा पुर्नजन्म २१व्या क्ष(n)असल्यास, तो या स्वरुपात जन्माला येईल.
पुर्नजन्मीत क्ष(n)= २०व्या शतकातील क्ष[मी(मुर्त+अमुर्त)]+२१व्या शताकातील [क्ष(n)(मुर्त+अमुर्त)],
२१व्या शताकातील [क्ष(n)(मुर्त+अमुर्त)]= क्ष (n-१)ची अनुवंशीकता( मुर्त+अमुर्त)+ क्ष (n-१) ची अननुवंशीकता (मुर्त+अमुर्त)
:. पुर्नजन्मीत क्ष(n)=२०व्या शतकातील क्ष[मी(मुर्त+अमुर्त)]+[क्ष (n-१)ची अनुवंशीकता( मुर्त+अमुर्त)+ क्ष (n-१) ची
अननुवंशीकता(मुर्त+अमुर्त)]
अनुवंशीक साखळी=[क्ष, क्ष१, क्ष२, क्ष३, क्ष४, क्ष५.......क्ष(n)]
हा विचार मांडताना, क्ष[मी] हा वंशाची सुरवात (वर्तमान पिढी) आहे, असे गृहीत धरले आहे.
परंतु जर अनुवंशीक साखळी=[ क्ष(-n+१), क्ष(-५), क्ष(-४) , क्ष(-३), क्ष(-२), क्ष(-१), क्ष[मी], क्ष१, क्ष२, क्ष३, क्ष४, क्ष५.......क्ष(n)] असल्यास मग, आपला जन्मही कोण्या पुर्वाजांचा पुर्नजन्म असू शकेल.
किंवा आपलाही पुनर्जन्म ठरावीक काळानंतर भावी क्ष(n?) मधे झालेला असेल,
म्हणजे आखिल मानव जात म्हणजे= {क्ष[मी]पुर्नजन्म झालेला आहे ते+ क्ष[मी]ज्यांचा पुर्नजन्म व्हायचा आहे} ते असे असायला हवे होते,
त्यातील बहुतांश(?)लोकांना गत आयुष्याबद्दल स्मरण हवे होते. (ते तसे नाही)
@मी (क्ष) चे{ मुर्त [शारिरीक, चेहर्याची ठेवण इ.]+अमुर्त[बुद्धी, गुण इ.] } पुढच्या पिढीत(वंशसाखळीत) संक्रमित होत असताना,
एकवेळ अशी येईल, की मी[क्ष(n)]चा पुनर्जन्म होईल, व त्याला पुर्वीच्या भाषा, पुर्वीची ठीकाणे यांचे स्मरण होईल, आणि हे शक्य नाही.
कारण बुद्धीचे[अमुर्त] पुढच्या पिढीत हस्तांतरण होत असताना बुद्धीच्या
गुणवत्तेचे (तल्लख, मंद) अशी देवघेव होईल. आणि यामध्ये मी(क्ष) च्या स्मरणांचे
(आठवणीचा) प्रश्नच येत नाही. त्यामुळे आपण काढलेला निर्ष्कष १००% असत्य
आहे.
मुर्त [शारिरीक, चेहर्याची ठेवण इ.] याचे आपल्या पुढील पिढीत हस्तांतरण काहीजणाना आपल्या हयातीतच दिसून येते,
उदाः बाबासारखा दिसणारा मुलगा/ आईसारखी दिसणारी मुलगी. (यात घरातील इतर सदस्यांचासुद्धा समावेश होऊ शकतो आजोबा, आत्या वैगरे)
यात आईसारखी दिसणारा मुलगी म्हणजे तिचा पुर्नजन्म ठरू शकत नाही. कारण येथे जिवात्मा वेगवेगळे आहेत.
सगळ्याच जीवाचा पुर्नजन्म होतो, (मोक्ष मिळालेले सोडून) परंतू आपल्या
व्याखेतील पुर्नजन्म म्हणजे एखाद्याला आपल्या गतआयुष्यातील आठवणीचे स्मरण
होणे.
या अनुषंगाने पुर्नजन्मीत क्ष(मीn)= गत जन्मातील क्ष[मी(मुर्त+अमुर्त)]+[क्ष (n-१)ची अनुवंशीकता( मुर्त+अमुर्त)+ क्ष (n-१) ची
अननुवंशीकता(मुर्त+अमुर्त)]
१) यात ही मी (क्ष चा जिवात्मा)= मी(क्ष n चा जिवात्मा) हवा, (आता हे कसे ओळखायचे? ते त्या "क्ष" लाच आणि देवाला ठाऊक..!!)
२)मी[(क्ष n चे बौद्धिक अस्तित्व (स्मरण)]=अमुर्त[मी (क्ष चे गत जीवनातील स्मरण)]+ अमुर्त[मी (क्ष n चे वर्तमानजीवनातील स्मरण)]
३)
अ] मी(क्ष n चे शारीरीक अस्तित्व)= मुर्त[मी (क्ष ची गत जीवनातील शारिरीक ठेवण)]+ मुर्त[मी (क्ष n चे वर्तमानजीवनातील
शारिरीक ठेवण)]
किंवा
ब] मी(क्ष n चे शारीरीक अस्तित्व)= मुर्त[मी (क्ष n चे वर्तमानजीवनातील शारिरीक ठेवण)]= क्ष (n-१)ची अनुवंशीकता( मुर्त)+
क्ष(n-१) ची अननुवंशीकता (मुर्त).
असे काहिसे हवे तरच क्ष(मी) चा पुर्नजन्म क्ष(n) मध्ये झाला, हे ठामपणे सांगता येईल.
आपण मांडलेल्या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी वरील गोष्टीची पुर्तता होणे आवश्यक आहे.