तुम्ही दिलेला दुवा उघडत नाहीये.
पण त्यात काय असावे याचा साधारण अंदाज तुमच्या प्रतिसादावरून करता येतो.

१. असाच जल्लोष चालणारा फोटो, जर भाजप सत्तेवर आला असता तर "डॉन" वा तत्सम पेपराने छापला असता का?
२. या फोटोवरून "त्यांना" सुद्धा हेच केंद्रात पाहिजे होते असाच अंदाज निघतो का?

थोडक्यात काय? आपल्याकडे भाजपा आले नाही म्हणून पाकिस्तानात जल्लोश झाला. ठीक आहे. झाला असेल.
पण त्यामुळे हे कुठे सिद्ध झाले की परकिय शक्तींनी आपल्या निवडणूकीवर प्रभाव टाकला?


३. त्यांनी, इथल्या निवडणूकींमध्ये प्रत्यक्ष प्रभाव टाकणारी, जातीय / धार्मीक समीकरणांद्वारे त्यांची "आवड" संपूर्ण भारतावर लादली असेल काय?
अशी "आवड" कशी लादता येते बुवा? मला स्वतःला पाकिस्तानात बऱ्याच गोष्टी घडवून आणायला आवडेल. तशी इच्छा असणे वेगळे. आणि घडवून आणणे वेगळे; नाही का?


४. संस्थानांनी, अणुकरार धोक्यात टाकून, " राष्ट्रहितवादी" सरकार, इथे केंद्रात येउ दिले असते काय?
तेच तर विचारतोय मी. 'संस्थाने' (म्हणजे अमेरिका, असे मी समजतो आहे. ) कशी काय प्रभाव टाकतात ते सांगा. त्यांना काय वाटत असेल ते सांगू नका.


. संस्थाने, त्यांच्या देशात "उच्चशिक्षीत" नेता, " इथे" असणे पसंद करतील की " प्रखर राष्ट्रहितवादी" देशी नेते इथे खुर्चीवर बसलेले त्यांना आवडेल?
पुन्हा तेच. त्यांच्या आवडीनिवडी सोडा हो. त्यांनी प्रभाव कसा टाकला ते सांगा. (साम, दाम, दंड, भेद अशी वचने फेकू नका.)


६. सत्ताधिष व डावे, २६/११ नंतर, "क्षेत्रीय" महासत्तांची, "चाकोरीबाहेरची" मदत मिळवू शकले नाहीत. कारण क्षेत्रीय महासत्तांना देखील या उपखंडात उद्ध नको होते. मग त्यांना "राष्ट्रहितवादी" पक्ष सत्तेवर आला असता तर त्यांची डोकेदुखी वाढली असती का कमी झाली असती?
क्षेत्रीय महासत्ता (म्हणजे चीन का? सरळ नावे लिहा हो. क्रिप्टीक लिहू नका. )

ये पब्लीक है, ये सब जानती है. होय नं?
हे तर खरंच.
म्हणूनच ११६ वर थांबावे लागले भाजपाला!

काही मुद्दे असतील तर प्रतिसाद द्या. अन्यथा आम्ही समजून घेऊ शकतो तुमच्या भावना.
(या अशा भूलथापा ब्रेनवाशीत स्वयंसेवकांपुढे देत चला. त्यांना पचतील.)

धन्यवादच.