पोकळी आहे म्हणे हे विश्व सारे
ही अवस्था एकट्या माझीच नाही  ... फारच सुंदर.

त्या मिठीचा गंध येतो आजसुद्धा
सांगतो की, ती तुझी झालीच नाही   - ती म्हणजे कोण? मिठी की मिठी मारणारी?

प्रेम माझे जेवढे आहे तिच्यावर
जिंदगीचे तेवढे नक्कीच नाही    ... हे ही आवडले

रोज निर्देशांक मृत्यूचा वधारे
सारखी तेजी इथे, मंदीच नाही    ..... व्वा! खरेच आहे.