होय, तुम्ही सांगीतलेली संकल्पना फार फार उपयोगी आहे व ती शास्त्रीय देखील आहे. विंग्रजीत त्याला " रँडम सँपलींग " असेच म्हणतात. तुम्हीलोक,  नेमक्यावेळी, नेमक्या ठिकाणची शिते उचलता [यात तुम्ही निष्णात असता ] म्हणुनच तर तुमचे  अनुमान अचूक ठरतात.

इथे सांगणे योग्य की अयोग्य माहित नाही, पण याचाच सु- योग्य वापर करून एका संस्थेला २ दिवसात २.५ लाखाचा नक्त फायदा करून दिला आहे.

पण यत्र तत्र सर्वत्र हे सर्वांनाच नाही जमत.

 " प्रेशर कुकर-- साईड इफेक्ट " म्हणा हवे तर.

बाकी २ सेनांचे म्हणाल तर, एकात " निर्माणाचा " हातखंडा आहे, दुसऱ्यांत " पालनाचा "  हातखंडा आहे.

ब्रह्मदेवाचे कर्तव्य, कौशल्य, जबाबदारी, अधिकार वेगळे. श्री. महाविष्णूची कर्तव्ये, कौशल्ये, जबाबदाऱ्या व अधिकारक्षेत्र वेगळे.

तसेच महादेवाचे. महादेव कोण, हे माझ्या प्रतिसादावरून कळण्यासारखे आहे.

धन्यवाद !