संबंध जोडुनीया पेचांत अडकलेले
जवळून पाहिले मी काही दुरावलेले - छान!
आश्चर्य वाटले की हृदयांस ना उमगले
झटकून टाकलेले होते स्थिरावलेले - ! हा हा हा !
समजून रीत घ्या हो.. अंती जगात असती
पहिले प्रकाश देता.. दुसरे प्रकाशलेले - खरे आहे.
पाहून रिक्त नजरा.. माझे मला समजले
इतके मला कुणीही नव्हते चितारलेले - सुंदर!
आहे प्रकाश ज्याचा.. राहील तोच अंती
विरतील चंद्र सारे एकेक माळलेले - अगदी खरे आहे.
(व्यक्तिगत रोख व/वा विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)