एका विशिष्ट जातीला इतर सर्व जातींच्या मागासलेपणास जबाबदार धरल्यावर ब्राह्मणांबरोबर इतर जातीही चर्चेत येणारच.
आज जे ब्राह्मणांकडे एक बोट रोखत आहेत त्यातील कित्येकांची चार बोटे स्वतःकडे रोखलेली आहेत हे विसरतात. - वृकोदर.
संपूर्ण चर्चेत, जेव्हा आपण (सर्वांनीच) इतरांकडे बोट दाखवून, प्रतिवाद केला, त्यावेळी, वरील न्याय आपल्यालाही लागू होतोच. ह्यासदरात, केलेला युक्तिवाद, (भाग १-२) "ब्राम्हणांना आणखी किती झोडपणार ?" ह्यापेक्ष्या, "फ़क्त ब्राम्हणांनाच का झोडपता ?" ह्यासदरात चपखलपणे बसणाराच आहे.
आपल्याला कुठले प्रतिसाद/उत्तरे योग्य वाटली. याचा उच्चार आपण कूठे केल्याचे आढळले नाही.
ज्ञानार्जनासाठी लागणारी नम्रता आणि ऐकून घेण्याची विद्यार्थीवृत्ती आपल्या ठायी नाही.
काही उदाहरणे.
१) माझ्या लेखनात दोन्ही प्रकारच्या चुका असतील, क्षमस्व. - बुध, २७/०४/२००५ ( भाग-१)
2)व्रुकोदरांची प्रातिक्रिया आवाडाली. - बुध, २७/०४/२००५ ( भाग-१)
3)वृकोदरांच मत मी वाचलं, आणि मला आवडलही. पण ईतरांच मत जाणून घ्यायची ईच्छा आहे. प्रतिक्रिया दिल्याबद्दल अभिराम आणि वृकोदरांचे आभार. प्रश्नांन्ना ईतरांचिही उत्तरे मिळतील ही अपेक्षा. - बुध, ०४/०५/२००५ ( भाग -१ )
४)झालंगेलं विसरुन, ब्राम्हणांना झोडपण बंद व्हावे ही माझीही इछ्छा आहे. भोभेकाका म्हाणाले त्याप्रमाणे द्वेशाने काहीच साध्य होणार नाही. - सोम, १६/०५/२००५ (भाग - २ )
५)आपल्यावर वैयक्तिक टिका कारण्याचा माझा हेतु नव्हता ह्याची कृपया नोंद घ्यावी. - शुक्र, १३/०५/२००५ ( भाग -२)
6)द्वेषामुळे देश रसातळाला जातो. मान्य आहे. कुठल्याही प्रकारच्या द्वेशाचं समर्थन करणे हे चुकचं .... चर्चा / वाद-विवाद व्हावे आणि काहीतरी निश्कर्ष निघावा अशीच माझी इछ्छा आहे. [ हयालेखाचे शीर्षक "मान्य आहे" असेच आहे. ] (भाग - २ ) - सोम, १६/०५/२००५
जिथे-जिथे जे-जे पटलं/आवडलं त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा कमीपणा न मानता त्याबद्दल माझे अभिप्राय मी दिले आहेत. माझ्याकडून काही चुक झाली आहे, हे जेव्हा आपण माझ्या लक्षात आणून दिले, त्या-त्यावेळी, त्याबद्दल मी स्पष्टिकरण सुद्धा दिले आहे. मनोगतवर ठिकठिकाणी मला जे आवडले त्याबद्दल मी मनापासुन स्तुति केली आहे. कोणावरही अपमानास्पद, वैयक्तिक टिका-टिप्पणी मी केलेली नाही. माझ्यावर आपण केलेला व्यक्तिगत आरोप संपुर्णपणे खोटा आहे.
ह्याउलट, आपला (सर्वांचाच) बराचसा प्रतिवाद, दुसऱ्यांकडे बोटे दाखवणारा होता, हे ( मनोगतींव्यतिरीक्त ) कोणीही मान्यकरेल.
१) वेद, पुराण, उपनिषद अध्यात्म इ. चा रोजच्या व्यवहारात जर काहिच उपयोग नव्हता तर, त्याची जाण असणारे ब्राम्हण उच्चवण्रिय आणि इतर गौणवण्रिय कसे ठरलेत ?? - ह्याप्रश्नाला दिलेलं उत्तर आवडलं पण पडलेलं नाही. वेद, पुराण निरर्थक होते, असे मी प्रथमच ऐकले.
२) जाती व्यवस्थेत इतरांना ब्राम्हाणांच्या खाली आणुन, कोणी व का ठेवले ?? - उत्तर मिळालेलं नाही.
३) प्राचिन योग, आयुर्वेद त्याकाळ्च्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचले होते का ?? - उत्तर मिळालेलं नाही.
४) जर नाही तर का नाही ?? त्यांना त्याची गरज नाही, हे कोणी ठरवलं ?? - उत्तर मिळालेलं नाही.
५) हजारो वर्षांपासुनचं ज्ञान उपेक्षितांपर्यंत पोचविताना संतांना तत्कालीन ब्राम्हणांनि दिलेल्या त्रासाबद्दल आपला काय मत आहे ??- ह्यावर बरीच चर्चा झाली. ऐनवेळी भाग -१ बंद झाला, आणि चर्चा अपुर्ण राहीली.
६) जर त्या ज्ञानाची काही गराजचं नव्हती, आणि त्याने रोजच्या आयुष्यात काहीही साध्य होणार नव्हते, तर, संतांनि तो खाटाटोप का बरं केला ?? - उत्तर मिळालेलं नाही.
७) ब्राम्हणानी सुरुवाती पासुनच ज्ञानदानाचे कार्य उत्तम प्रकारे केलं असतं तर, फ़ुले, आगरकरांची गरज लागली असाती काय ?? - उत्तर मिळालेलं नाही.
पटतील अशी उत्तरे मिळाली असती तर गप्प बसण्याचा समंजसपणा मी नक्किच दाखवला असता. जे-जे बरोबर वाटलं त्यावर विनाकारण वाद वाढेल अशी टिप्पणीही केलेली नाही.
इतरांकडे बोटे दखवून, तिच तिच उदाहरणे परत-परत दिली गेलीत, आणि ईतरांमध्येही भरपुर लोकं खराब होती, असाच चर्चेचा एकंदर रोख आहे. आपण इतरांबद्दल न बोलता फ़क्त आपल्याबद्दल बोलावे, हे माझे म्हाणणे ग्राह्य धरण्यात आले नाही. एकूण वाद, ब्राम्हण विरुद्ध ते, असा न राहता, मनोगती विरुद्ध मी असाच चालु आहे, ह्याचे वाईट वाटते.
मयुरेश वैद्य.
तुम्हाला राजकारण येत नाही म्हणता पण बोलता मात्र राजकारण्यांसारखेच. तुम्ही काय केले? हे विचारल्यावर, इतरांनी काय केले/करावे हे सांगून मोकळे झालात. इतरांकडे बोट दाखवून आपल्या चूका झाकण्याचा प्रयत्न करू नका. - पंकज. शुक्र, ०६/०५/२००५