"वर धादांत खोटे लिहिले आहे की माझी इच्छा होती म्हणून!"

विडंबन व्हावे अशी तुमची इच्छा असल्याचं आम्ही लिहिलेलेच नाही. किंबहुना "मूळ गजलेचे मुळीच विडंबन होऊ नये" या तुमच्या जाहीर इच्छेनेच पुलस्ती यांच्या गझलेचं विडंबन करण्याची आम्हाला प्रेरणा दिली व ते ऋण आम्ही त्या वाक्यात मानले आहे.
"...त्यातही पुलस्ती यांची जमीन वापरून!"

विडंबन मूळ कवितेची जमीन वापरूनच करतात भूषणराव.
  
बाकी, आमच्या रचनेस "सामान्य", "बकवास" किंवा आणखी काहीही म्हणण्याचा इतर वाचकांप्रमाणे तुम्हालाही पूर्ण अधिकार आहे. आपल्या विशेषणांना आम्ही अभिमानाने बिरुदाप्रमाणे मिरवू याची खात्री बाळगा.

क. लो. अ.

(व्यक्तिगत रोख व/वा विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. त्यामुळे संदर्भहीन झालेले शीर्षक बदलले : प्रशासक)