काही मनातलं येथे हे वाचायला मिळाले:
आज पुन्हा सोमवार. पुन्हा आठवड्याचं रुटीन सुरू झालंय. गेली ५ वर्षं वीकेंडनंतर सोमवारी ऑफीसला जाताना येणारा कंटाळा आणि आणि शुक्रवारी संध्याकाळी 'अरे! संपला पण आठवडा!' असं वाटणं आता अंगवळणीच पडलंय.पण मागच्या रविवारी मात्र उद्यापासून ऑफीसला जायचं ह्या कल्पनेने मी चांगलीच अस्वस्थ झाले होते. एक तर दहा महिन्यांची लांबलचक सुट्टी झाल्यामुळे सगळं रुटीन परत बसवायचं होतं. आणि आता फक्त माझं आणि नवर्याचंच नाही तर लेकीचं आणि पर्यायाने आईचं (म्हणजे माझ्या आईचं) पण रुटीन बदलणार होतं. लेकीला पाळणाघराची सवय मी आधीपासूनच लावली होती. पण त्याव्यतिरिक्त गेल्या ९ ...