माझी माय सरस्वती येथे हे वाचायला मिळाले:

आज फारा दिवसांनी येणं केलंत कवी.
बरोबर आहे, मीच तुमची आठवण..म्हणजे अगदी खरीखुरी, कचकचीत आठवण आज काढली.
त्याचं काय आहे कवी, तुमची बहुतांश कविता कॉलेजातल्या एखाद्या माजोर्ड्या दोस्तासारखी 'लागते'. एकदा लागली की पिच्छा सोडत नाही मग. माझं डोकं एकाच वेळेला थरारतं, उठतं, पिकतं, स्तब्ध होतं वगैरे वगैरे. (५१२ मेगाबाइट्स वर विन्डोज व्हिस्टा चालवल्यासारखी गत.) आणि सध्या तरी एवढी रॅम तुमच्या कवितेपाठी घालवायची अगदीच गरज नाहीये मला!

पण हा कडकडीत उपासदेखील सहन होण्यातला नव्हता. त्यामुळे आजोळी गडग्यातून जाता जाता वाटेत जसं एखाद्या झाडावरून ...
पुढे वाचा. : ख्वाब था या खयाल था,...क्या था?